

DEBUG
‘वाणी, व्यवहारात...’ या पुस्तकात आपल्याला वाणी संबंधित कित्येक मौलिक सिद्धांताची माहिती प्राप्त होत आहे. वाणी मुख्यत: निर्जीव आहे, ही केवळ एक टेप रेकॉर्ड आहे, ज्याचे पूर्ण रेकॉर्डींग आपल्या मागील जन्मांत झालेले आहे. वाणी ही अतिशय अमूल्य वस्तू आहे, जिची किंमत समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणालाही दु:ख होऊ नये. दादाश्रींनी या पुस्तकात वाणीचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनात होणार्या व्यवहाराला लक्षात ठेवून, अनेक उदाहरणासह दाखवले आहे ज्यामुळे आपल्याला हे समजते की आपण आपली वाणी कशा प्रकारे कोमल आणि मधुर बनवू शकतो. ज्याप्रमाणे एखादी टेप वाजवण्यापूर्वी त्यात रेकॉर्डींग केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तोंडून जी वाणी निघते ती सर्व मागच्या जन्मात केलेल्या रेकॉर्डींगचाच परिणाम आहे. वाणीच्या सिद्धांतांना अधिक खोलवर समजण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.
Email sharing only available when logged in.
Log In or Sign Up now.
Choose a size:
Copy Code: